वृत्तानुसार, हळद शिजवताना कुकर मधून पाणी गळती झाल्याने हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. कच्ची हळद कुकरमध्ये शिजवताना कुकर मधून पाणी गळती का होत आहे हे बघण्यासाठी सुनील कुकर जवळ गेला असता कुकरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की कुकरचे अक्षरश तुकडे होऊन दूरवर जाऊन पडले. या स्फोटात सुनील हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी मुलगा आणि एक अन्य मजूर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर डोंगर कोसळले आहे.