उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (12:04 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद आणखीनच शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे.
 
नारायण राणे यांच्या अटकेचं नाट्य घडल्यानंतर आता या वादाचा पुढचा अध्याय समोर येत आहे.
 
नारायण राणे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत 25 ऑक्टोबर 2020 रोजी दसरा मेळाव्यात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. 
 
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधातही एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणेंवर अनेक आक्षेपार्ह शब्द वापरत टीका करण्यात आली होती. याविरोधातही भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती