Nashik News : केस कापताना डोक्यात कोयत्याने वार

सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (12:39 IST)
Nashik Crime नाशिकमधील देवळाली इथं केस कापण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयता गँगने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओसुद्धा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अमन शेख असे या हल्ल्यातील जखमी युवकाचे नाव आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे अमन हा केस कापण्यासाठी सलूनमध्ये बसला होता. तेथील इसमाशी तो निवांत गप्पाही मारत होता.  तेव्हा अचानक तीन ते चार जणांची टोळी दुकानात घुसली. त्यांनी कटिंगला बसलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. डोक्यात, मानेवर, हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती