गणेशोत्सवासाठी यंदा मध्य रेल्वेकडून 74 विशेष गाड्या
सोमवार, 4 जुलै 2022 (21:12 IST)
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 74 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात कोकणवासिय हे कोकणात जात असतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होता. त्यामुळे दरवर्षी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या पुरवल्या जातात.
1. मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (44 सेवा)
01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. २१.८.२०२२ ते ११.९.२०२२ पर्यंत दररोज ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.०० (दुपारी २) वाजता पोहोचेल.
01138 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २१.८.२०२२ ते ११.९.२०२२ पर्यंत दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
किती कोणते डबे : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.
२. नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ सेवा)
01139 विशेष नागपूर येथून दि. २४.८.२०२२ ते १०.९.२०२२ या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
01140 विशेष मडगाव येथून दि. २५.८.२०२२ ते ११.९.२०२२ या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण: सर्व गणेशोत्सव विशेषसाठी बुकिंग दि. ४.७.१०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. गरजेनुसार आणखी काही गणपती स्पेशल ट्रेन्स येणाऱ्या दिवसांत जाहीर केल्या जातील.