'ते' 46 गुन्हे परत घेता येणार नाहीत : मुख्यमंत्री

शनिवार, 1 डिसेंबर 2018 (15:54 IST)
मराठा समाजाला आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात 546 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 46 गुन्हे वगळता अन्य सर्व गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आंदोलनात एकूण 546 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 46 गुन्हे हे परत घेता येणार नाहीत. यामध्ये पोलिसांवर हल्ले करण्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. 117 गुन्हे मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. 314 प्रकरणांत आरोपपत्र दाखल करून ते गुन्हे मागे घ्यावे लागणार आहेत, त्याचीही शिफारस केली जाईल. भीमा-कोरेगाव प्रकरणात 655 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 159 प्रकरणांत गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. 275 प्रकरणी आरोपपत्र मागे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर 158 गुन्हे तपासात आहेत. मात्र, यामध्ये 65 गुन्हे मागे घेता येणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती