पुण्यात फोडल्या २४ तासात २७ गाड्या

मंगळवार, 12 जून 2018 (15:10 IST)
पुण्यात २४ तासास वेगवेगळ्या ठिकाणी २७ गाड्या फोडण्यात आल्या आहेत. यामुळे सामन्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून , कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल करत आहेत. दहशत माजवण्यासाठी किंवा कोणाचा बदला घेण्यासाठी नाशिकमध्ये सर्वात आधी रात्री गाड्या जाळणे किंवा फोडून टाकणे हा प्रकार सुरु झाला आणि पाहता पाहता याचे लोन पूर्ण राज्यात पोहोचले आहे. पहिल्या घटनेत अल्पवयीन मुलांनी निगडी सहयोग नगर येथे 8 ते 10 वाहनांची तोडफोड केली. दुसरी घटना भोसरीत घडली असून रात्री 17 वाहनांची तोडफोड केली.  घटनेला 24 तासाचा अवधी होत नाही तोच निगडी येथे वाहन तोडफोडीची घटना घडली आहे. निगडीतील सहयोग नगर येथे सोमवारी रात्री 11 च्या सुमारास वाहन तोडफोडीचा प्रकार घडला आहे. चार अल्पवयीन मुलांचे आपापसात किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. याच भांडणातून त्यांनी परिसरातील वाहनांवर दगड आणि काठ्या मारून तोडफोड केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मारहाण आणि तोडफोड करणा-या दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघेजण घटनास्थळावरून पळून गेले आहेत. मात्र या मुलांमुळे इतके नुकसान होते आहे. याचे भान त्यांच्या पालकांना कधी येणार, या मुलांवर कठोर चौकशी करत शिक्षा करत त्यांना अद्दल घडवा अशी मागणी होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती