20 एकरावरील ऊस जळून खाक ;शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

मंगळवार, 1 मार्च 2022 (18:14 IST)
यंदा राज्यात अवकाळी पावसानं उच्छाद मांडला होता. अवकाळी पावसामूळे शेतकरी  बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधव मोठ्या कष्टाने पीक पिकवतो आणि त्याची काळजी घेतो. आपल्या लेकरा प्रमाणे त्याची जोपासना करतो. आणि जर या पिकाचे नुकसान झाले तर शेतकरी मात्र कोलमडून जातो. सध्या उसाच्या पिकाची लागवड केलेल्या काही शेतकरी बांधव उसासाठी लागणाऱ्या पाणी आणि उसाच्या शेतात लागणाऱ्या विजेसाठी धडपडत आहे.

शेतकरी उसाच्या पिकांची काळजी मोठ्या कष्टाने घेतात. ऊस पिकल्यावर शेतकरीला मोठा आर्थिक आधार होतो. पण जर हाताशी आलेलं पिकाचे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्याचे काय होईल हे सांगता येत  नाही. असेच काहीसे घडले आहे. लातूर जिल्ह्याच्या तालुका निलंगाच्या हलगरा आणि तालुका औसाच्या नागरसोगा येथे. येथे शिवारातील 20 एकर वरील लावलेला उभा ऊस शॉटसर्किट मुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

हलगरीचे शेतकरी गोविंद गायकवाड, बालाजी गायकवाड, अनंत गायकवाड आणि उमाकांत गायकवाड यांचे 15 एकर आणि नागरसोगातील लागलेल्या उसाच्या शेतातील आगीत काशिनाथ मुंडे या शेतकरी बांधवांचा 8 एकरावरील ऊस जळाला आहे. या आगीत या शेतकरी बांधवांचे 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
20 एकरावरील लागला ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. या घटनेमुळे शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांवर निराशा पसरली असून परिसरातील शेतकऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती