या टोळक्याविरुद्ध महिला सरपंच रमाबाई जाधव यांनी सुरुवातीला जानेफळ पोलीस स्टेशन गाठले. मात्र, त्या ठिकाणी त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या सरपंच महिलेने तक्रार दाखल केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयातून तक्रार घेऊन त्या महिलेला पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले.
मात्र, या महिला सरपंचाला जानेफळ पोलिसांनी बराचवेळ ताटकळत ठेवले. मारहाण करणार्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महिला सरपंच हतबल झाल्या आहेत. मारहाणीत हात फ्रॅक्चर झाला असल्याचा आरोप महिला सरपंचाने केला आहे.