कोल्हापूर :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील १२०९ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी ११२९ म्हणजेच ९३ टक्के शिक्षकांना १ ते १० पसंती क्रमातील शाळा मिळाल्या आहेत. एकूण १३४३ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी १३४ शिक्षकांची बदली झालेली नाही. शिक्षण विभागाकडून बदली झालेल्या शिक्षकांच्या मेलवर बदली आदेश पाठवले असून त्यांना १६ ते २६ पर्यंत कार्यरत शाळेतून कार्यमुक्त केले जाणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रीया राबविण्याने बदली झालेल्या सर्व शिक्षकांना ईमेलवर बदली आदेश ग्रामविकास मंत्रालयाकडुन थेट मोबाईलवरच पाढविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची बदली प्रक्रीयेनंतर दरवर्षी होणारी चालमेलही प्रशासनाने थांबवली आहे. ज्यां शिक्षकांची सेवा सर्वसाधारण तथा सुगम शाळेमध्ये दहा वर्ष झाली आहे. त्यांना कोणतीही सबब ऐकून न घेता प्रशासनाने दुर्गम शाळेवर पाठविले आहे. अतिदुर्गम गणल्या जाणाऱ्या ३= शाळामध्येही अशा शिक्षकाची बदली झाली आहे.
आंतरजिल्हा बदलीने ५६ शिक्षक जिल्ह्यात गेल अनेक वर्ष परजिल्ह्यात काम करणाऱ्या शिक्षकांना अथवा परिजिल्ह्यातून जिल्ह्यात काम करणान्या शिक्षकांना आया जिल्हात बदली करून गाण्याचे वेध लागले होते. अशा शिक्षकांच्या बदली प्रस्तावाचाही शासनाने विचार करून त्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून ५६ शिक्षक बदलीने कोल्हापूरात आले आहे. तर कोल्हापूरातील ४८ शिक्षक स्वगृही परतले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor