आदिवासी वस्तीतील अतिशय गरजू आणि गरीब विद्यार्थी असल्याने त्यांना आदल्या दिवशी शालेय गणवेश देण्यात आला होता. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना सहावीत शिकणाऱ्या ऋषिकेशने आईकडे गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला. भारती सुरासे यांनी मुलाच्या भविष्याचा विचार करता तू मोबाईलवर गेम खेळू नकोस, अभ्यास कर अस म्हणत नकार दिला. त्या बाजार करण्यासाठी बाहेर गेल्या असता काही वेळाने भारती सुरासे या घरी आल्या. त्यांना ऋषिकेश दिसेना म्हणून त्यांनी शेजारील खोलीत डोकाऊन बघितलं तर ऋषिकेशने ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे दिसले. दरम्यान आदिवासी वस्तीमध्ये राहणारा ऋषिकेश सुराशे हा हुशार विद्यार्थी होता.