बारावी नंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आहे. हा निकाल सोमवार (11 जून) रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येईल. सोबतच बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.