शरद पवारांच्या कन्येचा दिविजानं मोडला रेकॉर्ड

शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (13:30 IST)
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. 44 वर्षीय फडणवीस यांनी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 
 
सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस दुसर्‍या नंबरवर आहेत. स्वत: फडणवीस यांनी शरद पवार यांचा हा रेकॉर्ड तोडला नसला तरी त्यांची कन्या दिविजा हिनं मात्र शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांचा रेकॉर्ड तोडलाय. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस मुंबईस्थित मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जातील. त्यांची मुलगी दिविजा ही सध्या पाच वर्षाची आहे. त्यामुळे, दिविजा ही मुख्यमंत्री निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला जाणारी मुख्यमंर्त्यांची सर्वात कमी वयाची मुलगी ठरणार आहे. 1978 साली जेव्हा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 38 वर्ष.. तर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या तेव्हा नऊ वर्षाच्या होत्या. 
 
पाच वर्षाच्या दिविजाला वडिलांच्या पक्षाचं नाव माहीत आहेच पण, ती आरशासमोर उभी राहून त्यांच्यासारखं भाषणंही देते.

वेबदुनिया वर वाचा