मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा मुहूर्त 4 वा. 26 मिनिटांनी

शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (11:16 IST)
शुक्रवारी 4 वाजून 26 मिनिटांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शपथ घेणार आहेत.  
 
या शपथविधीसाठी नेत्यांपासून, अभिनेत्यांपर्यंत ते खेळाडूंपासून उद्योगपतींपर्यंत सर्वांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
 
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
 
शपथविधीचा सोहळा कसा असेल?
 
1). वानखेडे स्टेडियमवर दिवसभर रेलचेल असेल. मात्र दुपारी दोनपासून कार्यक्रमाला सुरूवात होईल.
 
2). दुपारी दोन वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यानंतर संध्याकाळी 4 वाजून 26 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
 
3). यानंतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. या शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री ‘ओपन कार’मधून संपूर्ण मैदानाला फेरफटका मारून, उपस्थितांना अभिवादन करेल.
 
4). या सोहळ्यानंतर सर्व मंत्री भाजप कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतील. सुमारे अर्धा तास या भेटी-गाठी चालतील.
 
5.) यानंतर मंत्र्यांचा ताफा मंत्रालयाकडे निघेल. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातांना वंदन करतील
 
6.) मंत्रालयात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात सुत्रे हाती घेतील.
 
7) यानंतर कॅबिनेटची बैठक होईल.
 
8) कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत पत्रकार परिषद होईल.
 
9) यानंतर रात्री खात्यांबाबतची घोषणा केली जाईल.
 
10) शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सर्व मंत्री पदभार स्वीकारतील.

वेबदुनिया वर वाचा