मुंबईत पावसाची संततधार ; लोकल मंदावली

शुक्रवार, 29 जुलै 2016 (10:36 IST)
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु असून लोकल वाहतूकही मंदावली आहे.

मध्यरात्रीनंतर पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. आजही मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर कायम आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक

10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. वरळी, लालबाग लोअर परेल, दादर, माटुंगासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली इथेही वरुणराजाने हजेरी लावली आहे. शिवाय विक्रोळी, घाटकोपर, पवई, भांडुप, ठाणे, डोंबिवलीमध्ये पाऊस सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा