मुंबईच्या महापौरांवरील ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

मंगळवार, 31 मार्च 2015 (15:20 IST)
शंभर कोटींच्या विकासनिधी वाटपाबाबत गैरव्यवहार होत असल्याचा आरोपाबाबत महापौर स्नेहल आंबेकर यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.
 
अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या वॉडार्तील विकासकामांसाठी राखीव निधी वाटपाचा महापौरांना अधिकार असतो़ मात्र ठेकेदारांच्या संगनमताने व नगरसेवकांकडून टक्केवारी घेऊन महापौरांनी निधीचे वाटप केल्याचा आरोप मनसेने केला होता़ महापौरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्यानंतर देशपांडे यांनी यावर महापौरांबरोबर झालेल्या संभाषणाची आॅडिओ क्लीप आज जाहीर केली. यावरून खळबळ उडाली आहे.

वेबदुनिया वर वाचा