माळीण दुर्घटना:30 तासांनंतर सुखरुप बाहेर निघाला चिमुरडा!

शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (11:27 IST)
जिल्ह्यातील अंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना 30 तासांनंतर बचाव पथकाने आई आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला सुरक्षित बाहेर काढले. या महिलेचे नाव आहे. प्रमिला लिंबे या मातेचे नाव असून रूद्र असे चिमुरड्याने नाव आहे.

दरम्यान, बुधवारी पहाटे माळीण गावावर मोठी दरड कोसळल्याने संपूर्ण गाव माती आणि चिखलाखाली सापडले आहे.

प्रमिला लिंबे आपल्या मुलाला स्तनपान करत असताना ही दरड कोसळल्याचे सांगितले जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. महिलेच्या पाठीला थोडा मुकामार लागला असून, मुलाला थोडे खरचटले आहे. दोघांवर मंचर येथे उपचार सुरु आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांना वाचवण्यात बचावपथकाला यश आले आहे. तर मृतांचा आकडा 30 झाला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून सामूहीक अंत्यविधी करण्‍यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा