महाप्रसादातून शेकडो भक्तांना विषबाधा

बुलढाणा- गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा तालुक्यातील निमगाव-नारायणपूर येथे आयोजित भंडा-यात महाप्रसाद ग्रहण केलेल्या गावातील शेकडो भक्तांना विषबाधा झाली आहे. बुधवारी या रुग्णांवर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
नारायणपूर येथे १४ सप्टेंबर रोजी गावक-यांनी महाप्रसादाचे आयोजन दुपारी केले होते. गावातील सुमारे ४००-५०० लोकांनी महाप्रसाद घेतल्यानंतर सायंकाळी ५ वाजेदरम्यान ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे यासारखे त्रास जाणवू लागल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी नेले आहे. निमगाव येथील तसेच नांदुरा येथील रूग्णवाहिकामधून तातडीने रूग्णांना पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविले आहे. अजूनतरी कोणाच्या दगावले अथवा इतर वाईट बातमी नसून, मात्र सर्वाची तब्येत अजूनतरी खराब आहे.

वेबदुनिया वर वाचा