मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात बाजू मांडणार

मुंबई- मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 28 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयात राज्य शासनामार्फत अधिक भक्कमपणे बाजू मांडली जाईल, असे शिक्षणमंत्री तथा मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
 
मराठा आरक्षण समितीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मराठा आरक्षण समितीच्या बैठकीला मराठा आरक्षण समितीचे सदस्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अजित पवार, आमदार विनायक मेटे, राजेंद्र कोंढरे यांच्यासह या विषयाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा