मृत मुलाचं नाव सार्थक महेश सोळशे असं आहे. सार्थकचे आई-वडील शेतमजूर आहेत. तो त्यांच्यासोबत शेतात गेला होता. मात्र त्याचवेळी तिथे बिबट्याने हल्ला केला. आई-वडिलां समोर बिबट्याने मुलाला उचलून ऊसाच्या शेतात नेलं होत. या घटनेने मोठा गोंधळ निर्माण झाला आणि लोकांनी बिबट्यावर चाल केली आहे. बिबट्याच्या तावडीतून सार्थकला सोडवण्यासाठी तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत बिबट्याने त्याचा फडशा पाडला होता.