पुण्यात सीपीएमच्या कार्यालयावर हल्ला,आरएसएसवर संशय

बुधवार, 3 सप्टेंबर 2014 (10:31 IST)
पुण्यातील माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या(सीपीएम)कार्यालयावर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञातांनी हल्लेखोरांनी हल्ला केला.आप्पा बळवंत चौकात सीपीएमचे कार्यालय असून 12 ते 15 अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयातील टेबल खुर्च्यांची मोठी तोडफोड केली. यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व हिंदुत्त्ववादी संघटनांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप सीपीएमचे नेते डॉ.अशोक ढवळे यांनी केला आहे. 
 
सीपीएमचे राज्य सेक्रेटरी मिलिंद सहस्त्रबुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात 15 नागरिक अचानक कार्यालयात शिरले. त्यातील काही जण मराठी तर काही दक्षिण भारतीय भाषेत बोलत होते. हल्लेखोरांनी केमिकल सदृश्य द्रव्य फेकल्याचाही दावा सीपीएमचे नेते अजित अभ्यंकर यांनी केला आहे. ऑफिसमधील कर्मचा-यांना धक्काबुक्की करत कार्यालयातील टेबल खुर्च्यांची तोडफोड केली.आरोपींवर कठोर कारवाई करण्‍याची मागणी अभ्यंकर यांनी केला आहे.
 
दरम्यान, केरळमध्ये आरएसएसच्या एका कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. त्यानंतर डाव्या विचारसरणीच्या  पक्षांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी डाव्या पक्षाचे कार्यकर्ते व संघाच्या कार्यकर्त्यांत केरळमध्ये संघर्ष झाला होता. त्यामुळे या हल्ल्यामागे हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात असल्याचे आरोप केला आहे.
 
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरु केली आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना लवकरच जेरबंद करू असेही पोलिसांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा