ही इमारत नुकतीच बांधण्यात आली होती, मात्र गुरूवारी इमारतील थोडे तडे गेल्याने ती झुकली होती. त्यामुळे काही रहिवासी इमारतीतून बाहेर पडले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तीनच मजल्यांची परवानगी देण्याच आलेली असतानाही पाच मजल्याचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले अशी माहिती समोर येत आहे.
काम अपुर्णावस्थेत असलेल्या या ईमारतीमध्ये काही कुटुंब राहत होती. काल या ईमारतीला तडा जाउन ती काहीशी झुकली. त्यामुळे इमारतीत राहणारी कुटुंबं आधीच इमारतीतून बाहेर आली होती. मात्र रात्री 3 वाजताच्या दरम्यान इमारतीच्या खाली लावलेली कार आणण्यासाठी एक युवक पुन्हा इमारतीखाली गेला. मात्र त्याचवेळी संपूर्ण इमारत खाली आल्याने तो इमारतीखाली अडकला असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणनं आहे.