महाराष्ट्र राज्यात प्रथमच आणि तळेगाव येथे झालेल्या आंदोलनाची झळ पूर्ण राज्यात पसरू नेये म्हून नाशिक शहरामध्ये सोमवारी सकाळपासून (दिनांक १०) बंद करण्यात आलेली मोबाईल इंटरनेट सेवा शनिवारी दुपारी दीड वाजता सुरु झाली आहे. सदरची मोबाईल इंटरनेट सेवा सलग सहा दिवस बंद होती. राज्यात अशाप्रकारे इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची पहिलीच घटना आहे. दुसरीकडे संवेदनशील गावांमधील संचारबंदी दोनदा शिथिल करण्यात आली. मात्र गावांमध्ये तणाव दिसल्यामुळे प्रशासनाने या गावांमधील संचारबंदी चोवीस तासांसाठी वाढविली आहे.
तळेगाव येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेर्धात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. यात काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण आले. शहरामध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक अफवा उसळल्या. यामुळे वातावरण अधिकच तापले. या परीस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व मोबाईल नेटवर्क आणि काही ठिकाणी इतर इंटरनेट सुविधा बंद केल्या होत्या, त्यामुळे मोठा पारिणाम दिसून आला होता. यामुळे अफवा थांबल्या आणि त्यामुळे होणारे नवीन भांडणे थांबली होती.यामुळे पोलिसांनी एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करून त्यांनी गुन्हेगार पकडले आहेत.