ठाणे महापालिका अधिकार्‍याचा मृत्यू

शनिवार, 20 सप्टेंबर 2014 (10:40 IST)
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी संजय खैरनार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारादरम्यान खैरणार यांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाची लिफ्ट बंद असल्यामुळे खैरणार यांनी तीन मजले चढून नगरविकास विभागातील मिटिंगसाठी आले होते.
  
तीन मजले चढून आल्याने खैरणार यांना उलट्या झाल्या तसेच त्यांना घाम सुटला. त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात हलवले. उपचार झाल्यानंतर खैरणार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नंतर त्यांना ज्युपिटरमध्ये वेळीच हलवले आणि उपचार सुरु असतानाच खैरनार यांचा मृत्यू झाला. 

वेबदुनिया वर वाचा