गंगाकिनारी सेल्फी काढायला गेल्यास अटक

कानपूर- गंगा नदीकिनारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जर कोणी व्यक्ती गंगा बॅरेजवरुन खाली उतरुन सेल्फी, फोटो काढण्यासाठी किंवा आंघोळीसाठी गेली तर त्याला अटक करण्यात येईल. गेल्याच आठवड्यात सेल्फी घेण्याच्या नादात 7 तरुणांचा गंगा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
 
सप्टेंबर 2015 पासून आतापर्यंत 24 लोकांचा गंगा नदीच्या किनारी बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. सिंचन विभागाच्या मदतीने गंगा बॅरेजवर 8 ते 10 फूट उंच बॅरीकेडींग केली जाणार आहे, जेणेकरुन लोक फोटो काढण्याच्या नादात खाली उतरु नयेत.

वेबदुनिया वर वाचा