विधानसभा निवडणूकीपासून कोल्हापूरातील टोलचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. येथील नागरिकांचा टोलचा विरोध आहे. त्यामुळे सातत्याने आंदोलन केले जात आहे. बुधवारी टोल देण्यास नकार देणाºया एका ट्रकचालकाला कळंबा येथील टोल वसुल करणार्या कर्मचार्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या टोलविरोधी कृती समितीच्या महिलांनी गुरुवारी नाक्यावर जाऊन मारहाण करणार्या कर्मचार्यांना चोप दिला. अचानक झालेल्या या घटनेमुळे येथील टोलवसुली काही काळापुरती थांबली होती. दरम्यान, चालकाला मारहाण करणार्या कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केली आहे.