कामत पक्षात परतले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर कामत यांची नाराजी दूर झशली असून त्यांनी समाजकारणातून पुन्हा राजकारणात उडी घेतली आहे.
 
काम यांनी 6 जून रोजी ट्विटरवरून राजीनाम देत असल्याची व राजकारण संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अता त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील बंड शांत करण्यात पक्षाला यश आलं आहे.
 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कामत यांच्यासारखा चेहरा गमावणे क्राँग्रेसला परवडले नव्हते. त्यामुळे कामत यांचे मन ‍वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. दिल्लीत अहमद पटेल आणि सुशील कुमार शिंदेची भेट घेतली. सोनिया गांधीच्या भेटीनंतर गुरूदास कामत यांनी राजीनामा घेतला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा