मिळालेल्या माहितीनुसार, कविता करकरे राहत्या घरात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. नंतर त्यानायं रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयात आणले तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. कविता करकरे यांना त्यांची ह्रदयक्रिया सुरळीत सुरु व्हावी, यासाठी त्यांच्यावर उपचार केले गेले. मात्र, त्या उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे सकाळी डॉक्टरांनी सांगितले होते. करकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते.