एक्स्प्रेस वे वरील वाहतूक काही काळ बंद
मुंबई पुणे एक्स्प्रेस-वे वर बुधवार-गुरुवारी रोड ब्लॉक करण्यात येणार आहे. आडोशी बोगद्याच्या परिसरातील दरड काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक काही काळ बंद राहील.
एक्स्प्रेस वे वर चार ते पाच ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या दरडी काढण्याचं काम आजपासून सुरु करण्यात येणार आहे. या वेळेत महामार्गावरुन प्रवास टाळावा, असं आवाहन एमएसआरडीसीनं केलं आहे.दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान 15 मिनिटांसाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
त्यानंतर 2 ते 3 च्या दरम्यान अर्ध्या तासासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.