इमारत कोसळून दहा ठार

मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (10:55 IST)
महापालिकेने ‘धोकादायक’ म्हणून जाहीर केलेली  कृष्ण निवास ही ५० वर्ष जुनी इमारत आज पहाटे कोसळून दहा ठार तर आठ जखमी झाले आहेत.

बी कॅबिन परिसरात असलेली ही जुनी इमारत धोकादायक असल्याने ती तातडीने खाली करण्याबाबतची नोटीस महापालिकेने बजावली होती. मात्र, त्यानंतरही येथे काही कुटुंब रहात होती. आज मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास इमारत कोसळली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून काही ढिगाºयाखाली  अडकले असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दल व एनडीआरएफचे जवान घटनास्थळी बचावकार्य करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा