अवकाळी पावसामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढला

सोमवार, 2 मार्च 2015 (10:05 IST)
हवामानात अचानक झालेला बदल आणि काल मुंबईसह राज्यात झालेल्या अकाली पावसामुळे स्वाइन फ्लूचा आजार फैलावण्याचा धोका वाढला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने डॉक्टरांना तापाच्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
मुंबईत झालेल्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी आरोग्य तज्ज्ञांसोबत बैठक घेतली आणि स्वाइन फ्लूमुळे उद्भवू शकणार्‍या परिस्थितीचा आढावा घेतला. निसर्ग अनुकूल नाही. त्यामुळे आपल्याला सावध राहाणे गरजेचे आहे, असे सांगून, ‘एखाद्या रुग्णास 100 डिग्रीपर्यंत ताप असल्यास त्यावर तातडीने उपचार सुरू करा, अशा सूचना सावंत यांनी यावेळी डॉक्टरांना दिल्या.आज राज्यात स्वाइन फ्लूचे 139 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 1635 वर गेली आहे, तर आतापर्यंत 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात विविध जिल्ह्यांत 275 स्वाइन फ्लूचे रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यापैकी 35 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
 
आणखी 139 जणांना लागणमहाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात स्वाइन फ्लूची साथ असून त्यात अनेकांचा बळी गेला आहे. शनिवारी दिल्लीतही पाऊस झाल्याने चिंतेत भर पडली आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने स्वाइन फ्लूची साथ ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. 

वेबदुनिया वर वाचा