सिटी ग्रुप जपानमधील शाखा विकणार

वार्ता

रविवार, 30 नोव्हेंबर 2008 (19:24 IST)
मंदीच्या विळख्यात अडकलेल्या सिटी ग्रुप इंकार्पने जपानमधील निक्कोसिटी ट्रस्ट एंण्ड बँकिंग कॉर्पोरेशन ही आपली शाखा विकण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवहारातून बँकेला 40 अब्ज येन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लवकरच ही निलामी होणार असून, यात जपानमधील प्रमुख बँक मित्सुबिशी यू एफ् जे समूहाला सूमितोमो ट्रस्ट आणि मिजुहो ट्रस्ट या प्रमुख बँका सहभागी होण्याची शक्यता आहे.

जपानमधील वर्तमानपत्रांनी या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले असून, 10 ते 20 अब्ज येनमध्ये हा करार होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

वेबदुनिया वर वाचा