सध्या जगाला ज्या अर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारचे संकट 100 वर्षांतून एक किंवा दोन वेळाच येत असल्याचे अमेरिकेतील अर्थ तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री हेन्री पाल्सन यांनी या संकटांचा सामना करण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले आहे. आर्थिक संकटामागे सरकारची निष्क्रियता आणि चुकीचे निर्णय यासारखे अनेक कारणे असल्याचेही त्यांनी सांगितले.