सिटी ग्रुप दिवाळखोरीच्या मार्गावर आल्यानंतर कंपनीचे प्रमुख विक्रम पंडित यांच्या हकालपट्टीच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. आज अमेरिकी सरकारने सिटी ग्रुपला आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर विक्रम पंडित यांची गच्छंतीही टळली असल्याचे मानले जात आहे.
गेल्या वर्षभरात कंपनीचे 74 हजारांवर कर्मचारी काढण्यात आले असून, कंपनीची आर्थिक अवस्था खराब असल्याने आणखी कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. यानंतर कंपनीचे प्रमुख विक्रम पंडित यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार अथवा त्यांची हकालपट्टी होणार असल्याचे बोलले जात होते.
आज अमेरिकेने सिटी ग्रुपसाठी विशेष पॅकेज जाहीर केल्यानंतर आता पंडितांनीही आनंद व्यक्त केला असून, आता कंपनी आणि ग्राहकांसाठी वाट्टेल ते करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.