इलेक्ट्रॉनिक उत्पादनात आघाडीचे नाव असलेल्या फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स या नेदरलॅंडस्थित कंपनीने नोकरकपात करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. उलट आपली उत्पादन यंत्रणा विकसित देशातून विकसनशील देशात हलविण्याचेही कंपनीने ठरविले आहे.
कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी गेरॉर्ड क्लिस्टरले यांनी ही बाब स्पष्ट केली. मात्र, त्याचवेळी मंदीचा परिणाम कंपनीवर झाल्याचेही मान्य केले. इतर कंपन्यांप्रमाणेच फिलिप्सही संकटात आहे, असे त्यांनी सांगितले.