गुजरातच्या केमिकल उद्योगालाही मंदीचा फटका

जागतिक आर्थिक संकटाची सावली गुजरात मधील केमिकल उद्योगावरही दिसून येत असून, मागणी कमी झाल्याने उद्योगांचे उत्पन्न घटले आहे.

प्रकाश ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रबंध निदेशक दिलीप शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदीमुळे आतापर्यंत उद्योगाला 20 ते 30 टक्के फटका बसला आहे. शाह यांना गुजरातमधील इतर उद्योजकांनीही दुजोरा दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा