बुडीत खात्यात निघालेल्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या सिटी ग्रुप आणि त्यांच्या वित्तीय संस्थांना अखेर अमेरिकी अर्थखात्याने मदत करण्याचे जाहीर केले असून, सिटी ग्रुपला 20 अब्ज डॉलरची मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे.
अमेरिकेतील या सर्वात मोठ्या बँकेला बुडीत खात्यात निघण्यापासून रोखण्यात येणार असून, बँकेचे समभाग विकत घेण्यात येणार असल्याचे अमेरिकी सरकारने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बँक दिवाळखोरी जाहीर करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त सातत्याने येत असल्याने बँकेच्या संचालक मंडळावरही निर्माण झालेला दबाव यानंतर काहीसा कमी झाल्याचे बोलले जात आहे.