सिटीग्रुपला तारण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू

भाषा

सोमवार, 24 नोव्हेंबर 2008 (13:13 IST)
सिटीग्रुपच्‍या 'बॅलेंस शीट'वरून अब्‍जावधी डॉलरच्‍या संकटग्रस्त संपत्तींना हटवून बँकेला तारण्‍यासाठी शेवटचे प्रयत्‍न सुरू झाले असून आता त्‍यावरच सिटीग्रुपची भिस्‍त राहणार आहे.

सिटीग्रुपला मॉर्गेजसंबंधीच्‍या गुंतवणुकीमुळेच मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला असून मिळालेल्‍या माहितीनुसार सिटीग्रुप एका ठराविक पातळीपर्यंत हे नुकसान सहन करून उर्वरित नुकसान सरकारला सोसावे लागणार आहे.

यासंदर्भात 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्‍या वृत्तानुसार जर सरकारला मोठा तोटा सहन करावा लागला तर या बँकेत सरकारची भागिदारी वाढविली जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा