'शेअर निर्देशांकावरुन अंदाज लावणे चुकीचे'

शेअर बाजाराचा निर्देशांक हा केवळ एक नाममात्र आकडा असतो, त्याचा आर्थिक मंदी आहे अथवा नाही याचा अंदाज लावायचा नसतो असे मत अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे.

भारत आर्थिक संमेलनात आलेल्या उद्योगपतींना आज तिसऱ्या दिवशी अर्थमंत्र्यांनी संबोधीत केले. काही जणांना केवळ शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे आर्थिक मंदी ओळखण्याचे माध्यम वाटते परंतु हा केवळ एक आकडा असून, यावरून देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावणे चुकीचे असल्याचे अर्थमंत्र्यांनी आज स्पष्ट केले.

देशाच्या कृषीक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे अर्थमंत्री म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रूपयांची घसरण होत असल्याने यावर नियंत्रण करण्यासाठी ठोस उपाय केले जात असल्याचेही चिदंबरम यांनी यावेळी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा