विश्वासाचा दोरा अजून तुटला नाही- लघु उद्योग

वार्ता

रविवार, 23 नोव्हेंबर 2008 (15:44 IST)
जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसल्यानंतरही देशातील लघु उद्योजकांमध्ये विश्वास कायम असून, सरकार आणि ग्राहकांच्या बळावर आलेल्या संकटाचा सामना करण्यात यश येईल असा विश्वास देशातील लघु उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

आर्थिक मंदीने सध्या बँकांनी कर्ज देणे आवरते घेतले असून, गुंतवणूकदारांनी बाजाराकडे पाठ केल्याने लघु उद्योगावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

सध्या राजधानी दिल्लीत भारतीमय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात देशभरातून अनेक लघु उद्योजक सहभागी झाले आहेत. यात आलेल्या उद्योजकांमध्ये अजूनही उत्साह कायम असून, सरकारसोबत बांधला गेलेला विश्वासाचा दोरा जोपर्यंत बळकट आहे, तोपर्यंत आपल्याला कोणतेही भय नसल्याचे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा