सध्या जगभर असलेल्या आर्थिक संकटातही भारत वाचला याचे कारण भारतीय बॅंका आहेत, असे सांगत कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी बॅंकाच्या राष्ट्रीयकरणाचा इंदिरा गांधी यांचा निर्णय योग्य होता, असे सांगितले.
हिंदूस्ताना टाईम्सतर्फे झालेल्या 'लीडरशीप समिट'मध्ये त्या बोलत होत्या. इंदिरा गांधी यांनी दूरदृष्टिने घेतलेल्या निर्णयामुळेच आपण आर्थिक संकटातून वाचलो हे सांगून, अजूनही सावधगिरी बाळगायला पाहिजे, असा सल्लाही दिला. उदारीकरणाच्या दिशेने पुढील वाटचाल सावधगिरी व सतर्कतेने केली पाहिजे. उदारीकरणाचे आम्ही समर्थक असलो तरी याचा अर्थ अनियंत्रित अर्थव्यवस्थेला पाठिंबा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.