बँक अधिकाऱ्यांनी बलिदान द्यावे- ओबामा

अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीतून मार्ग काढण्यासाठी कर्मचारी कपात करण्या ऐवजी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बलिदान देत आपल्या वेतनात कपात करावी असे आवाहन अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहेत.

बँकेची परिस्थिती खराब असल्याने कर्मचारी कपात हा त्यावर एकमेव तोडगा नसून, कपात करण्याऐवजी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे ओबामा म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा