फेडरल बँकेचे 'बेल आऊट' पॅकेज जाहीर

वार्ता

बुधवार, 26 नोव्हेंबर 2008 (17:24 IST)
मंदीच्या कचाट्यात अडकलेल्या अमेरिकी उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी अमेरिकी सरकारने 700 अब्ज डॉलरचे विशेष पॅकेज जाहीर करूनही काही फायदा न झाल्याने अमेरिकी फेडरल बॅकेने आज 800 अब्ज डॉलरच्या पॅकेजची घोषणा केल्याने अमेरिकी उद्योजकांनी दिवाळी साजरी केली आहे.

अमेरिकेत घर विकत घेण्यासाठी आणि निर्माण खर्च कमी करण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

गेल्या सात वर्षांमध्ये अमेरिकी बाजारात मोठी घसरण झाली असून, घराच्या किंमतींमध्ये 17.4 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार देशातील बाजारातील उत्पादनही घटले आहे. संपूर्ण देशाला मंदीचा फटका बसला असून, कर्जदारांना दिलासा देण्यासाठी हे पॅकेज उपयोगी असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा