पाच लाख कर्मचारी बेकार होणार

आर्थिक मंदीचा जबर फटका देशातील वस्रोद्योगाला बसणार असून, येत्या पाच महिन्यांमध्ये पाच लाखांवर कर्मचारी बेकार होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.

आर्थिक मंदीने भारतीय बाजारावर परिणाम झाला असून, निर्यात कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांवर बेकारी ओढवणार असल्याची भीती वाणिज्य सचिव जी के पिल्लै यांनी व्यक्त केली आहे.

वाणिज्य मंत्रालय वस्रोद्योगासाठी खास पॅकेजवर काम करत असून, पुढील महिन्यात हे पॅकेज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे पिल्लै म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा