अमेरिकन वृत्तसंस्‍थेत 10 टक्‍के कर्मचारी कपात

भाषा

शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2008 (10:38 IST)
अमेरिकन वृत्तसंस्‍था असोसिएटेड प्रेसने (एपी) 2009 मध्‍ये आपल्‍या कर्मचा-यांमध्‍ये 10 टक्के कपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

एपीचे प्रवक्ते पॉल कोलफर्ड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की एपीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी टॉम कर्ली यांनी कपातीची घोषणा केली आहे. सर्व विभागांची आणि कर्मचा-यांची काम करण्‍याची क्षमता पाहून एपी पुढच्‍या वर्षात कर्मचा-यांची कपात करणार आहे.

वेबदुनिया वर वाचा