रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? "तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.
ती अशी की, आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले.
शेवटी शंंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली.
ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले.
त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याचवेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली.
काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे _
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः || तथा लिखितवान्प्रात:प्रबुध्हो बुधकौशिकः ||
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी --- शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे.
‘श्रीरामरक्षा’ह्या स्तोत्राचे महत्व काय?
परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे.
बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.
हातपाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.
रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.
रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे.
राम राम!
आपण कधी विचार केला आहे का , की आपण "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो.कारण |
र = २७ वा शब्द. (क ख ग घ ड..........)
आ = २ रा शब्द. (अ आ..)
म = २५ वा शब्द शब्द.(अ आ............)
एकूण = ५४.
राम + राम.
५४+५४ = १०८.
आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.
ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो.....
रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= लक्ष्मण होते
नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते.
हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते.
असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात, शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते.
अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते.
सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते.
रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।
रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।
या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी),भो राम(संबोधन).
ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.
रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच!!!
एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?
रामनामकवच:
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती नीट पहा....
पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥
म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत!!
आता, थोडं थांबा....'छद्मचारिणः' हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना 'pseudopodium'हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे pseudopodiumम्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात!! थोडक्यात; इथे 'राक्षस' हे अलिफ-लैला सारखे शिंगं वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.
रामरक्षा सिद्ध कशी करावी?
121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा
गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज 13 वेळा...किंवा
अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.
इतर फायदे:
आपदामपहर्तारम.....हा श्लोक 1 लक्ष वेळा म्हणल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे.
संपूर्ण रामरक्षेचे 15000 पाठ केल्याने रामरक्षा सिद्ध होते.
प्रत्येक अवयवाचे स्वतन्त्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते.
उदा:
कौसल्याये दृशो पातु:.... हा श्लोक सतत म्हटल्याने...