नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे महाअष्टमीला खूप महत्त्व आहे. यावर्षी चैत्र नवरात्रीची अष्टमी 29 मार्च 2023 रोजी आहे. या दिवशी महागौरी मातेची पूजा केली जाते. तिला दुर्गाष्टमी असेही म्हणतात. नवरात्रीत नऊ दिवस उपासना व उपवास करणे शक्य नसेल तर अष्टमी व नवमीच्या दिवशी उपवास करून देवीची उपासना केल्याने संपूर्ण 9 दिवस उपासनेचे फळ मिळते, अशी परंपरा आहे. महाअष्टमीच्या दिवशी काही युक्त्या केल्याने दारिद्र्य आणि संकट दूर होतात असे म्हणतात.
सनातन धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. हे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि विधींमध्ये वापरले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, तुळशीमध्ये देवी लक्ष्मी निवास करते आणि नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये तिचे काही चमत्कारी उपाय खूप प्रभावी आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप लावल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
नवरात्रीत येणाऱ्या गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाणी आणि कच्चे दूध अर्पण केल्यास पैशाची समस्या दूर होते. यावेळी नवरात्रीत गुरुवार हा रामनवमीच्या दिवशी पडत आहे. आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी या दिवशीही हे उपाय करू शकता. नवरात्रीमध्ये देवीसमोर दिवा लावल्यानंतर तुळशीसमोरही दिवा लावावा. यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होते.