रक्षाबंधनाला भद्राची सावली किती काळ ?

शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (13:28 IST)
रक्षाबंधन हा सण सोमवार, 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरा होत आहे. यावेळीही रक्षाबंधनाला भद्राची सावली असेल. ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधली जात नाही. अशात भद्रा कालावधी किती काळ टिकेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा कालावधी सकाळी 09:51 पासून सुरू होईल आणि दुपारी 01:30 पर्यंत असेल. या काळात राखी बांधता येईल का?
 
भद्रा वास : 19 ऑगस्ट 2024 रोजी भद्रा वास पाताल लोकात असेल. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, भद्रा पृथ्वीवरील असेल तरच त्याचे नियम वैध आहेत. भद्रा कुठेही राहिली तरी तिचा पूर्णपणे त्याग करावा, असा उल्लेख काही शास्त्रांमध्ये आहे.
 
सर्वश्रेष्ठ मुहूर्त : मध्याह्न 3:30 ते 6:45 मिनिटापर्यंत
 
रक्षाबंधन भद्रा काळ :- सकाळी 09:51 ते 10:56 पर्यंत भद्रा पूंछ, 10:56 ते 12:37 पर्यंत भद्रा मुख आणि दुपारी 01:30 भद्रा अंत.
 
रक्षाबंधनाला राखी बांधण्याची शुभ मुहूर्त-
राखी बांधण्याची वेळ: दुपारी 01:34:40 ते 09:07:31 पर्यंत.
दुपारचा मुहूर्त: 01:42:42 ते 04:19:24 पर्यंत.
रक्षाबंधन प्रदोष मुहूर्त: 06:56:06 ते रात्री 09:07:31 पर्यंत.
 
इतर ज्योतिषीय मान्यतेनुसार:-
शुभ वेळ: दुपारी 2:00 ते 6:55 पर्यंत.
सर्वोत्तम वेळ: दुपारी 3:30 ते 6:45 पर्यंत.
पंचक : सायंकाळी 7:00 वाजल्यापासून पंचक सुरू होईल. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी राखी बांधावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती