Raksha Bandhan 2023: राखी कधी बांधायची? ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी काय सांगितले वाचा

बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (07:06 IST)
Raksha Bandhan 2023 देशभरात 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनावर भद्राची सावली असल्यामुळे राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता यावर चर्चा होत आहे. मात्र राखी पौर्णिमा हा सण साजरा करण्यासाठी अर्थातच भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसल्याची माहिती ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली आहे.
 
पूर्वीच्या काळात ज्या पद्धतीने रक्षाबंधन होत होते ते विधीपूर्वक असायचे. त्याकाळी रक्षाहोमाद्वारे रक्षासूत्र तयार करून राजाला बांधले जायचे तर रक्षा याची देवघरात कळशावर ठेवून पूजा होत असे मग ते सूत्र बांधलं जातं असायचं. याच प्रकारे जे विधीपूर्वक सूत्र तयार करणार असतील त्यांनी भद्राकाळ वर्ज्य करावा, असे त्यांनी सांगितले. 
 
परंतु रक्षाबंधन हा सामाजिक संबंध निर्माण करणारा सण म्हणून साजरा केला जातो. अशात बहिणीने भावाला, मित्र तसेच समाज बांधवांनी एकमेकांना जो रक्षाबंधन उत्सव साजरा करायचा आहे तो 30 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करावा. त्यासाठी भ्रदाकाळ वर्ज्य करण्याचे कुठलेही कारण नाही. या कार्याला वेळेची मर्यादा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
खरं तर पौर्णिमा तिथी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:58 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:14 वाजता समाप्त होईल. तसेच भद्रकाल सकाळी 10:58 ते रात्री 09:01 पर्यंत असेल. आणि भद्रकाळात राखी बांधू नये अशी चर्चा होत असल्यामुळे हा सण कधी साजरा करायचा याबद्दल अनेक जण संभ्रमात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती