Punjabi Dhaba : फणस भाजी

साहित्य : फणस असमासे अर्धा किलो, ४ मोठे कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची, धणे पूड, काळीमिरी पूड, गरम मसाला, मीठ चवीनुसार, मोहरी तेल.

कृती : सर्वप्रथम फणसाची साले काढून त्याच्या फोडी कराव्यात. या फोडी उकडून घ्याव्यात. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट करावी. एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट त्यात टाकावी. त्यानंतर उकडलेला फणस कुस्करुन घ्यावा आणि तो त्यात घालावा. गरम मसाला टाकून ५ मिनिटे भाजी शिजवावी. ही भाजी खाण्यास पौष्टिक असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती