मटार-पनीर

साहित्य : दूध, मैदा किंवा डाळीचे पीठ, ओल्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ कांदा, लसूण, आले, धने, जिरे, लिंबू, साखर, तेल, एक वाटी मटाराचे दाणे व दोन मोठे लाल टोमॅटो.

कृती : पनीर तयार करून घेतल्यावर त्यात मैदा किंवा डाळीचे पीठ घालून, सारखे करून एका फडक्यावर अर्धा इंच जाडीचे पसरावे. त्यावर दुसरे एक फडके घालावे व त्यावर पाट ठेवावा. अंदाजे अर्ध्या तासाने त्यातील सर्व पाणी निघून जाईल. नंतर त्या पनीरच्या चौकोनी वड्या कापून, त्या तेलात किंवा तुपात तांबूस तळून घ्याव्यात व फोडणी करून त्यात इतर मसाला घालून व परतून नंतर त्यात वाफवून घेतलेले मटाराचे दाणे घालावेत. लिंबू पिळण्याऐवजी टोमॅटो चिरून घालावेत व नंतर पनीरचे तुकडे घालून चांगले उकळावे. पनीरच्या तुकड्यांपेक्षा मटाराचे दाणे जास्त प्रमाणात घालावेत.

टीप : याप्रमाणेच मटाराच्या दाण्यांऐवजी फ्लॉवर किंवा बटाटे घालून फ्लॉवर पनीर किंवा आलू-पनीर करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती